Posts

बीडच्या गेवराई तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस, कापसाचं मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Image
गेवराई (Gevrai) तालुक्यात रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं कापसाचं (Cotton) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. Beed Rain :  राज्यात परतीच्या  पावसानं  (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीड (Beed) जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्यात रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं कापसाचं (Cotton) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापसाच्या शेतात गुडाघाभर पाणी साचल्यानं पिक पूर्णत: पाण्याखाली गेलं आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून बळीराजा संकटात सापडला आहे. दिवाळीपूर्वीच सरकारनं तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा बीड जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी गेवराई तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसानं कापसाच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पूर्ण कापूस पीक पाण्याखाली गेलं आहे. लाखो रुपये खर्च करुन शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगवलं होतं, त्यातच आठ दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळं कापसाची बोंड काळी पडली अ

आमदार सुनील शेळकेंच्या भावावर 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल

पिंपरी : जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १५) दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एक गुन्हा मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यावर तर दुसरा गुन्हा तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात वाहन चालक असलेल्या ३६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार सुधाकर शेळके आणि मॉण्टी दाभाडे (दोघेही रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे १० सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या समोरील सेवा रस्त्यावर (लिंब फाटा) सार्वजनिक ठिकाणी थांबले होते. त्यावेळी फिर्यादी यांना अपमानित करण्याच्या उद्देशाने आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. दुसऱ्या प्रकरणात ३४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार किशोर आवारे, मिलिंद अच्युत (दोघेही रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे ११ सप्टेंबर रोजी साय

Pune | इंदोरी - सांगुर्डी रस्त्यावर टँकरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार

टँकरचालकाने अचानक टँकर वळविल्याने दुचाकीची टँकरला धडक... तळेगाव दाभाडे (पुणे) : टँकरखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. हा विचित्र अपघात इंदोरी - सांगुर्डी रस्त्यावर गुरुवारी (दि. २) सकाळी ११ वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळी टँकर सोडून पलायन केले. बादशाहआलम रफिकअहमद अन्सारी (२४, रा. जोशीवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ रा.उत्तर प्रदेश) असे अपघातातील मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकीचालक राजेश हरदेव निशाद (३८, रा. तळेगाव दाभाडे) हा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर देहू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरचालक आणि दुचाकीस्वार इंदोरी बाजूकडून सांगुर्डी बाजूकडे जात होते. राजेश निशाद हे दुचाकी चालवत होते, तर त्यांचा मित्र बादशाह आलम अन्सारी हा दुचाकीवर पाठीमागे बसला होता. मात्र टँकरचालकाने अचानक टँकर वळविल्याने दुचाकीची टँकरला धडक बसली. यात दुचाकीचालक राजेश निशाद हा बाजूला फेकले गेला, तर त्यांचा मित्र बादशाहआलम अन्सारी हा दुचाकीसह टँकरच्या चाकाखाली सापडल्याने मृत्यू झाला.