Pune | इंदोरी - सांगुर्डी रस्त्यावर टँकरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार

टँकरचालकाने अचानक टँकर वळविल्याने दुचाकीची टँकरला धडक...

तळेगाव दाभाडे (पुणे) : टँकरखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. हा विचित्र अपघात इंदोरी - सांगुर्डी रस्त्यावर गुरुवारी (दि. २) सकाळी ११ वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळी टँकर सोडून पलायन केले. बादशाहआलम रफिकअहमद अन्सारी (२४, रा. जोशीवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ रा.उत्तर प्रदेश) असे अपघातातील मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकीचालक राजेश हरदेव निशाद (३८, रा. तळेगाव दाभाडे) हा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर देहू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरचालक आणि दुचाकीस्वार इंदोरी बाजूकडून सांगुर्डी बाजूकडे जात होते. राजेश निशाद हे दुचाकी चालवत होते, तर त्यांचा मित्र बादशाह आलम अन्सारी हा दुचाकीवर पाठीमागे बसला होता. मात्र टँकरचालकाने अचानक टँकर वळविल्याने दुचाकीची टँकरला धडक बसली. यात दुचाकीचालक राजेश निशाद हा बाजूला फेकले गेला, तर त्यांचा मित्र बादशाहआलम अन्सारी हा दुचाकीसह टँकरच्या चाकाखाली सापडल्याने मृत्यू झाला.

Comments

Popular posts from this blog

आमदार सुनील शेळकेंच्या भावावर 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल

बीडच्या गेवराई तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस, कापसाचं मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी